दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क हिच्यासोबत अलीकडेच मुंबईत एक लज्जास्पद प्रकार घडला आहे. संबंधित तरुणी मुंबईतील खार परिसरातून लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना दोन भारतीय तरुणांनी तिच्याशी छेडछाड केली. यातील एका आरोपीनं पीडित तरुणीच्या गालावर जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच तो पीडितेला दुचाकीवर बसण्यासाठी हाताला पकडून जबरदस्ती करत होता. हा सर्व प्रकार लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान घडला.

हा प्रकार लक्षात येताच अन्य दोन भारतीय तरुणांनी प्रसंगावधान दाखवत दक्षिण कोरियन महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आरोपींना पकडण्यासाठी मदत केली. या प्रकारानंतर ह्योजॉन्ग पार्कने तिला मदत करणाऱ्या दोन्ही तरुणांची भेट घेतली आहे. तिघांनी एकत्र जेवण केलं आहे. याबाबतचे फोटो स्वत: पार्कने सोशल मीडियावर शेअर केले. तसेच दोघांनी केलेल्या मदतीसाठी आभार मानले आहेत. आदित्य आणि अथर्व अशी मदत करणाऱ्या दोन तरुणांची नावं आहेत.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Viral video IndiGo air hostess heartwarming surprise for brother who joined same airline melts hearts
भावाला इंडिगोमध्ये नोकरी मिळाली, एअरहोस्टेस बहिणीने दिले सरप्राईज, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकले नेटकऱ्यांचे मन

पीडित युट्यूबर महिलेचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहिल्यानंतर अथर्वने तिच्या बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्याने दोन्ही आरोपींना हुसकावून लावत ह्योजॉन्गला सुरक्षितपणे हॉटेलपर्यंत पोहोचण्यास मदत केली. तर आदित्यनं संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत पोलीस कारवाईसाठी तरुणीची मदत केली. त्यामुळे ह्योजॉन्ग पार्कने या दोघांसोबत मुंबईत एका हॉटेलमध्ये जेवण केलं आहे. या भेटीचा फोटो तिने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत म्हटलं की, “अखेर आज भारताच्या हिरोंना लंचसाठी भेटले.”

लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असताना ह्योजॉन्ग पार्कचा मुंबईतील खार परिसरात दोन तरुणांनी छळ केला. मोबीन चंद मोहम्मद शेख (१९) आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी (२०) असं दोन आरोपींचा नावं असून मुंबई पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.