"दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं", मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली 'Indian Heroes'ची भेट | South Korean YouTuber Hyojeong Park sexual molest meet with indian heros rmm 97 | Loksatta

“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट

दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क हिच्यासोबत अलीकडेच मुंबईत एक लज्जास्पद प्रकार घडला आहे.

“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
फोटो- ट्विटर/ @mhyochi

दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क हिच्यासोबत अलीकडेच मुंबईत एक लज्जास्पद प्रकार घडला आहे. संबंधित तरुणी मुंबईतील खार परिसरातून लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना दोन भारतीय तरुणांनी तिच्याशी छेडछाड केली. यातील एका आरोपीनं पीडित तरुणीच्या गालावर जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच तो पीडितेला दुचाकीवर बसण्यासाठी हाताला पकडून जबरदस्ती करत होता. हा सर्व प्रकार लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान घडला.

हा प्रकार लक्षात येताच अन्य दोन भारतीय तरुणांनी प्रसंगावधान दाखवत दक्षिण कोरियन महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आरोपींना पकडण्यासाठी मदत केली. या प्रकारानंतर ह्योजॉन्ग पार्कने तिला मदत करणाऱ्या दोन्ही तरुणांची भेट घेतली आहे. तिघांनी एकत्र जेवण केलं आहे. याबाबतचे फोटो स्वत: पार्कने सोशल मीडियावर शेअर केले. तसेच दोघांनी केलेल्या मदतीसाठी आभार मानले आहेत. आदित्य आणि अथर्व अशी मदत करणाऱ्या दोन तरुणांची नावं आहेत.

पीडित युट्यूबर महिलेचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहिल्यानंतर अथर्वने तिच्या बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्याने दोन्ही आरोपींना हुसकावून लावत ह्योजॉन्गला सुरक्षितपणे हॉटेलपर्यंत पोहोचण्यास मदत केली. तर आदित्यनं संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत पोलीस कारवाईसाठी तरुणीची मदत केली. त्यामुळे ह्योजॉन्ग पार्कने या दोघांसोबत मुंबईत एका हॉटेलमध्ये जेवण केलं आहे. या भेटीचा फोटो तिने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत म्हटलं की, “अखेर आज भारताच्या हिरोंना लंचसाठी भेटले.”

लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असताना ह्योजॉन्ग पार्कचा मुंबईतील खार परिसरात दोन तरुणांनी छळ केला. मोबीन चंद मोहम्मद शेख (१९) आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी (२०) असं दोन आरोपींचा नावं असून मुंबई पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 20:41 IST
Next Story
VIDEO: “हिंदू लोक बेकायदेशीर बायका ठेवतात अन्…” मुलींच्या लग्नाबाबत बद्रुद्दीन अजमल यांचं विधान; म्हणाले, “मुस्लिमांचा हा फॉर्म्युला…”