‘स्पेसएक्स’चे आणखी चार अंतराळवीर अवकाशात ; ६० वर्षांत ६०० अंतराळवीराचा प्रवास

रॉकेटमध्ये ४४ वर्षीय भारतीय अमेरिकन राजा चारी देखील होते, जे यूएस एअर फोर्स फायटर जेटचा प्रशिक्षित पायलट होते.

केप कॅनवेरल : अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि स्पेसएक्स यांनी चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पाठवले आहे. खराब हवामानासह अनेक कारणांमुळे दीर्घ विलंबानंतर, स्पेसएक्स रॉकेट अखेर बुधवारी या अंतराळवीरांना घेऊन रवाना झाले. ज्यात ६० वर्षांत अंतराळात पोहोचणाऱ्या ६००व्या अंतराळवीराचा समावेश आहे.

यूएस स्पेस एजन्सी नासाने सांगितले की जर्मनीचे मॅथियास मौरर यांचा बुधवारी अंतराळात गेलेल्या चार व्यक्तींमध्ये समावेश होता, जे अंतराळात जाणारे ६००वे व्यक्ती ठरले.  मॅथियास मौरर व्यतिरिक्त, इतर तीन अंतराळवीर २२ तासांच्या उड्डाणानंतर गुरुवारी संध्याकाळी अंतराळ स्थानकावर पोहोचतील. त्याला œc ३ असे नाव देण्यात आले आहे. रॉकेटमध्ये ४४ वर्षीय भारतीय अमेरिकन राजा चारी देखील होते, जे यूएस एअर फोर्स फायटर जेटचा प्रशिक्षित पायलट होते. त्यांना मिशन कमांडर बनवण्यात आले आहे.

खराब हवामानामुळे विलंब

खराब हवामानामुळे रॉकेटच्या उड्डाणाला विलंब झाला. बुधवारी रात्री रिमझिम पावसात चार अंतराळवीरांनी आपल्या कुटुंबाचा निरोप घेतला. हवामान तज्ज्ञांनी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवला होता आणि त्यात सुधारणाही झाली.

दोन दिवसांपूर्वी, स्पेसएक्स स्पेसक्राफ्ट यानातून नासाचे अंतराळवीर शेन किमब्रो आणि मेगन मॅकआर्थर, जपानचे अकिहितो होशिडे आणि फ्रान्सचे थॉमस पेस्केट हे पृथ्वीवर परतले. अंतराळ केंद्रात त्यांनी २०० दिवस व्यतीत केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Spacex sends four more astronauts to the international space station zws