५ ते १४ मार्च २०२२ या काळात होणाऱ्या जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये अनेक संकल्पनांभोवतीचे उपक्रम असणार असून इंडिया ७५ ही त्यातील एक प्रमुख संकल्पना आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना या फेस्टिवलच्या १५ व्या पर्वात अनेक सत्रांमध्ये भारताच्या वाटचालीच्या अनेक पैलूंचा आढावा घेतला जाणार आहे.

या आशयसमृद्ध कार्यक्रमात इतर अनेक पैलूंबरोबर एका सत्रामध्ये निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही व्यवस्था यांच्या कथनांचा आणि प्रतिकथनांचा ऊहापोह करण्यात येणार आहे. या पॅनेलमध्ये भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि एव्हरी व्होट काऊंट्सचे लेखक नवीन बी. चावला; भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरीचे लेखक गुरू प्रकाश पासवान; ख्यातनाम विधिज्ञ आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. मदन बी. लोकूर सहभागी होतील. विदुषी व लेखिका मुकुलिका बॅनर्जी यांच्याबरोबर या मान्यवरांचे पॅनेल राजकीय व निवडणूक प्रक्रिया, लोकशाहीचे विरोधाभास, तिचे विजय आणि असमाधान या विषयावर चर्चा करेल.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?

कोणत्या पुस्तकांचा समावेश?

आधुनिक भारताची उत्क्रांती ही राष्ट्र संकल्पनेच्या ऐतिहासिक, सामाजिक-राजकीय आणि मनोवैज्ञानिक अभ्यासाच्या संदर्भातील एक अद्वितीय घटना आहे. लेखक आणि पत्रकार साकेत सुमन यांचे द सायकॉलॉजी ऑफ अ पेट्रियट हे ज्ञानवर्धक पुस्तक भारताचा विचारप्रवर्तक प्रवास मांडते. लेखक, कवी आणि शिक्षणक्षेत्रातील विद्वान मकरंद आर. परांजपे यांच्या आगामी पुस्तकांमध्ये जेएनयू : नॅशनॅलिझम अँड इंडियाज अनसिव्हिल वॉर या पुस्तकाचा समावेश आहे. द यंग अँड द रेस्टलेस : यूथ अँड पॉलिटिक्स इन इंडिया या गुरमेहर कौरच्या नवीनतम पुस्तकात तरुणाईच्या भारतीय लोकशाहीतील निवडणुकीच्या अंगाने आणि वैचारिक गुंतवणुकीचा धांडोळा घेतला गेला आहे.

ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक बद्री नारायण यांच्या रिपब्लिक ऑफ हिंदुत्व : हाऊ द संघ इज रिशेपिंग इंडियन डेमॉक्रसी या पुस्तकात रा. स्व. संघाच्या धारणा आणि व्यवस्था यांच्यातील मन्वंतराचा मागोवा घेण्यात आला आहे. लेखिका, विदुषी आणि सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ मुकुलिका बॅनर्जी यांच्याबरोबरच्या संवादातून हे सगळे लेखक एका संपूर्ण राष्ट्राच्या आधारभूत तत्त्वांच्या आणि भविष्याच्या आधारावर ‘वयात येण्या’च्या प्रक्रियेचा मागोवा घेणार आहेत. कल्टिव्हेटिंग डेमॉक्रसी : पॉलिटिक्स अँड सिटिझनशिप इन ॲग्रेरियन इंडिया या मुकुलिका बॅनर्जी यांच्या नव्या दीर्घ निबंधामध्ये ग्रामीण भारतातील, खासकरून पश्चिम बंगालमधील राजकीय लोकशाही आणि सक्रिय नागरिकत्व यांच्यातील नात्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे. अन्य एका सत्रात बॅनर्जी या लेखिका, पत्रकार आणि अनुवादक नमिता वाईकर यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत. त्या दोघी मिळून देशाच्या राजकीय पटलाला आकार देणाऱ्या लोकशाही मूल्यांचा आणि कृषिकल्पनांचा आढावा घेणार आहेत.

भारतातील अपंगांच्या हक्कांची चळवळ महत्त्वाची आहे, पण तिला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेली नाही. भारतातील सामाजिक उद्योजक, लेखक आणि अपंग हक्क कार्यकर्ते निपुण मल्होत्रा; पत्रकार आणि कादंबरीकार सी. के. मीना, आणि सॅप इंजिनियरिंग अकॅडमीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख व्ही. आर. फिरोझ यांनी मिळून द इन्व्हिजिबल मेजॉरिटी : इंडियाज एबल्ड डिसएबल्ड हे भारतातील अपंगत्वासह जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यासंदर्भात अंतर्दृष्टी देणारे पुस्तक लिहिले आहे. भारतातील अपंगत्व आलेल्या व्यक्तींच्या हक्कांविषयी आणि प्रतिनिधित्वाविषयीच्या एका ज्ञानवर्धक सत्रात ते फेस्टिवलचे निर्माते आणि टीमवर्क्स आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक संजॉय के. रॉय यांच्याशी चर्चा करतील.

ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील आघाडीच्या विद्वान मानल्या जाणाऱ्या मरयम अस्लानी यांच्या काँटेस्टेड कॅपिटल : रूरल मिडल क्लासेस इन इंडिया या खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकात भारतातील प्रचंड मोठ्या आणि विकसित होत असलेल्या ग्रामीण मध्यमवर्गावर प्रकाश टाकण्यात आला आहे. लेखक, राजकीय नेते आणि माजी राजनैतिक अधिकारी पवन के. वर्मा यांच्याशी अस्लानी संवाद साधतील. वर्मा यांच्या द ग्रेट इंडियन मिडल क्लास या भेदक अभ्यासपूर्ण पुस्तकात त्यांनी विसाव्या शतकात या सामाजिक-आर्थिक वर्गाची उत्क्रांती कशी होत गेली याचा वेध घेतला आहे.

इंदिरा : इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राइम मिनिस्टर या पुस्तकाच्या लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांनी अटल बिहारी वाजपेयी या त्यांच्या नव्या पुस्तकात वाजपेयी यांचे अतिशय सखोल संशोधन करून लिहिलेले, त्यांच्या अनेक व्यक्तिगत पैलूंवर प्रकाश टाकणारे चरित्र साकारले आहे. लेखक, समाजशास्त्रज्ञ आणि पत्रकार नलिन मेहता यांच्या द न्यू बीजेपी : मोदी अँड द मेकिंग ऑफ वर्ल्ड्स लार्जेस्ट पोलिटिकल पार्टी या पुस्तकात या राजकीय पक्षाने भारतीय राजकारणाला कसे नवे वळण दिले, त्यासाठी नवी जातीय समीकरणे रचून तयार केलेल्या आपल्या पद्धतीच्या सोशल इंजीनियरिंगचा कसा वापर केला, दुर्लक्षित समाजघटकांवर लक्ष केंद्रित करून महिला मतदारांचा नवा वर्ग कसा तयार केला, याचा ऊहापोह केलेला आहे. पत्रकार मंदिरा नायर यांच्याबरोबरच्या संवादात हे लेखक वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा वारसा यांची चर्चा करतील.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ साली झालेल्या युद्धाचे स्मरण करणाऱ्या ऑपरेशन एक्स या भारताचे माजी नौदल अधिकारी कॅप्टन एमएनआर सामंत आणि लेखक संदीप उन्निथन यांनी लिहिलेल्या पुस्तकात जगातील एका मोठया छुप्या नौदलयुद्धाची अकथित कहाणी मांडली आहे. नौदलाचे इतिहासकार कोमोडोर श्रीकांत बी. केसनूर यांच्यासोबतच्या संवादातून ते या संघर्षाचे आंतरिक दर्शन घडवणार आहेत आणि त्यातील अनेक सूक्ष्म पैलू उजेडात आणणार आहेत.

पुरस्कारविजेते चित्रपटकार विनोद कापरी यांच्या १२३२ किमी या लघुपटात लक्षावधी स्थलांतरित मजुरांपैकी सात मजुरांच्या घरापर्यंतच्या प्रवासाचे चित्रण केले आहे. पत्रकार आणि लेखिका पूजा चंगोईवाला यांच्या होमबाऊंड या पुस्तकात मानवतेवर ओढवलेल्या संकटकाळात तगून राहण्याची आशा बाळगणाऱ्या एका जिद्दी कुटुंबाची गोष्ट सांगितली आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक चिन्मय तुंबे यांच्यासोबतच्या संवादात कापरी आणि चंगोईवाला हे या स्थलांतराचे आकडे, चेहरे आणि त्यामागील शक्ती यांची चर्चा करतील.

अरविंद यांच्यावर केंद्रित असलेल्या एका सत्रात वैद्यकीय डॉक्टर, कवी आणि तत्त्वचिंतक परीक्षित सिंग, लेखक मकरंद आर. परांजपे आणि शिक्षणतज्ज्ञ, संपादक आणि लेखक मालाश्री लाल हे मिळून श्री अरविंदांच्या तत्त्वचिंतनाविषयीचे त्यांचे दृष्टिकोन मांडतील आणि त्यांच्या लेखनातून व जीवनातून दिसणारी आंतरिक आस काय होती, याचा वेध घेतील.

हेही वाचा : “पद्म पुरस्कार येत आहे”, स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाल्याच्या वक्तव्यावरून स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंवर निशाणा

रामधारी सिंह दिनकर आणि सुभद्रा कुमारी चौहान यांच्यासारख्या हिंदी साहित्यातील नाममुद्रा बनलेल्या श्रेष्ठ साहित्यिकांची नावे उच्चारली तरी आदर्शवाद आणि प्रेरणा यांचा समसमा संचार होतो. लेखक, कवी आणि संगीततज्ज्ञ यतींद्र मिश्र आणि विद्वान लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि इतिहासकार त्रिपुदमन सिंग हे या दोन कवींच्या जीवन आणि वारशाबद्दल बोलतील, त्यांच्या सखोल वचनबद्धतेचा आणि गहिऱ्या देशभक्तीचा आढावा घेतील आणि आजही हिंदी साहित्याची ओळख आणि आकलन यांच्यावर असलेल्या त्यांच्या प्रभावाची चर्चा करतील.