आयसिस’ या दहशतवादी संघटनेच्या नावाशी साधम्र्य असलेल्या इंग्लंडमधील ‘द आयसिस अकॅडमी’ या शाळेचे नाव बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ऑक्सफर्ड शहरातील ही शाळा आहे. थेम्स नदीच्या जवळ ही शाळा असून हा भाग ‘द आयसिस’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी या शाळेचे ‘द आयसिस अकॅडमी’ असे नामकरण करण्यात आले होते. आता या शाळेचे ‘द इफली अकॅडमी’ असे बदलण्यात आले आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेच्या नावाशी साधम्र्य असल्यामुळे ही शाळा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होती. समाजमाध्यमांवर या शाळेबाबत नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या, असे एक्स्प्रेस या वृत्तपत्राने म्हटले आहे.
मुलांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देता का? अशी विचारणा करण्यात येऊ लागल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापक के विलेट यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला, असेही या प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळेच्या नावाबाबत सगळीकडून नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.