ब्रिटनच्या माजी पंतप्रधान दिवंगत मार्गारेट थॅचर यांना आदरांजली वाहण्यासाठी पार्लमेण्टचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले असून त्याला उपस्थित राहण्यासाठी ब्रिटिश खासदारांनी आपल्या सुटीचा दौरा अध्र्यावर सोडला आहे.
तथापि, थॅचर यांना आदरांजली वाहण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचे अनेकांनी ठरविल्याने फुटीचे चित्र पाहावयास मिळत आहे.थॅचर यांचे कोठे चुकले, याबाबत लेबर पक्षाचे नेते एड मिलिबॅण्ड लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. थॅचर यांच्या ११ वर्षांच्या राजवटीत मुक्त बाजार सुधारणा या चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहेत.
सदर विशेष अधिवेशनात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचे प्रमुख भाषण होणार आहे. मात्र पंतप्रधानांकडून पार्लमेण्टचा दुरुपयोग होत असल्याने आपण या अधिवेशनापासून दूर राहणार असल्याचे माजी मंत्री जॉन हिली यांनी म्हटले आहे.