इस्राईली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लडाखमधील ४ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. २९ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळच्या सुमारास हा स्फोट झाला होता. त्यानंतर तपास यंत्रणा आरोपींचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवत कारगिलमधून चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी दिल्लीत आणलं. चौकशी दरम्यान स्फोटाचा कट रचण्यात सहभागी असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात पोलिसांनी सीसीटीव्हीत चित्रित झालेल्या दोन व्यक्तींचा पत्ता सांगणाऱ्यांना १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या दोन व्यक्तींनी इस्राईली दूतावासाबाहेर स्फोटकं ठेवल्याचं तपासात उघड झालं होतं. त्यानंतर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती जॅकेट घालून फुटपाथवरून जात असल्याचं दिसले होते. त्यांच्यावर संशय आल्याने दिल्ली पोलिसाठी २०० सीसीटीव्हींचं फुटेज पाहिले. या सीसीटीव्हीत ते दोघंही चेहरा झाकून जात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तपासाची सूत्र त्यांच्या दिशेने वळवली आणि त्यांना ताब्यात घेतलं.

यावर्षी नवी मुंबईत सुरू होणार JIO INSTITUTE; नीता अंबानी यांची घोषणा!

दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर २९ जानेवारीला संध्याकाळी पाचच्या सुमारास स्फोट झाला होता. या स्फोटात काही गाड्यांचं नुकसान झालं होतं. घटनास्थळावर पोलिसांना एक पत्रही मिळालं होतं. त्यात हा फक्त ट्रेलर असल्याची धमकी देण्यात आली होती.