स्पाईसजेट या विमान वाहतुक कंपनीच्या एका विमानाला अचानक आग लागल्यामुळे त्याचं बिहार राज्यातील पटणा येथील बिहता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. या विमानात एकूण १८५ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी विमानातून सुखरुप बाहेर आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र स्पाईसजेटच्या बोईंग ७२७ विमानाला अचानकपणे आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा >>> ‘अग्निपथ योजना मागे घ्या’; जंतरमंतरवर काँग्रेसचा ‘सत्याग्रह’

मिळालेल्या माहितीनुसार स्पाईस जेटच्या बोईंग ७२७ या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानाला मागील डाव्या बाजूने अचानक आग लागली. ही आग फुलवारी शरीफ या गाातील लोकांनी पाहिली. या लोकांनी विमानाला आग लागल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. पटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी तशी माहिती दिली आहे. विमानामध्ये तांत्रित बिघाड झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “अग्नीपथ ही तरुणांना अग्नीत ढकलण्याची योजना”, कन्हैया कुमारचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

या विमानातील सर्व १८५ प्रवासी सुखरुप आहेत. या घटनेबद्दल एका प्रवाशाने सविस्तर सांगितले आहे. विमानाने दिल्ली येथून १२.३० वाजता उड्डाण केले होते. विमानाने उड्डाण केल्यापासून त्यात काहीतरी बंद असल्याचे आम्हाला सारखे वाटत होते, असे एका प्रवाशाने सांगितले. तर विमानाने उड्डाण घेतल्यानंतर दिवे मिचमिचत होते. विमानात काहीतरी चुकीचे घडत होते, असे आम्हाला वाटत होते, स्पाईसजेटचा हा निष्काळजीपणा आहे, असे दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले आहे.

हेही वाचा >>> “धार्मिक द्वेषाबाबत दुहेरी मापदंड असू शकत नाही”; संयुक्त राष्ट्रात भारताची स्पष्ट भूमिका

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या विमानाला उंची गाठता येत नव्हती. इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी हे विमान जवळपास २५ मिनिटे हवेतच होते. विमानाने लँडिंग केल्यानंतर विमानतळाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी विमानाकडे धाव घेतली. तसेच त्यांनी प्रवाशांना विमानातून सुखरुप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.