दिल्ली ते दुबई जाणाऱ्या स्पाईट जेट विमानाची कराचीत इमर्जेन्सी लॅंडींग करण्यात आली. विमानात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही इमर्जेन्सी लॅंडींग करण्यात आली. या विमानात १५० पेक्षा जास्त प्रवाशी असल्याची माहिती आहे. भारतीय विमान वाहतूक विभागाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

भारतीय विमान वाहतूक विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन आठवड्यातली ही ६ वी इमर्जेन्सी लॅंडींग आहे. आजची इमर्जेन्सी लॅंडींग इंधन दर्शकामध्ये झालेल्या बिघाडामुळे करण्यात आली. यापूर्वीही वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे तीन आठवड्यात ६ वेळा इमर्जेन्सी लॅंडींग करण्यात आली होती.

दरम्यान, या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता आहे. याबाबतचा अहवालही आम्ही मागितला आहे.”