केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. शनिवारी (९ ऑक्टोबर) इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये फिटनेस प्रेमी अनुराग ठाकूर यांनी आपल्या कौशल्याने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं आहे. इंडिया टुडे आणि आज तक न्यूजचे संचालक राहुल कंवल यांनी आव्हान दिल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी थेट मंचावर दोरीच्या उड्या मारण्यास सुरुवात केली. केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या या कामगिरीनंतर त्यांना उपस्थित प्रेक्षकांची मोठी दाद देखील मिळाली. हा व्हिडीओ अगदी कमी वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अनुराग ठाकूर यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते चक्क कुर्ता-पायजामामध्ये भर मंचावर विविध प्रकारे दोरीवरच्या उड्या मारताना दिसून आले आहेत. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा अनुराग ठाकूर यांचं खेळ आणि फिटनेसवरचं प्रेम दिसून आलं आहे. या कॉन्क्लेव्ह अनुराग ठाकूर एक क्रीडा राष्ट्र म्हणून भारताच्या प्रवासावर देखील बोलले. “खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन होणं आवश्यक्य आहे”, असं मत यावेळी अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे.

Sharad Pawar On PM Narendra Modi
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले, “रशियाचे पुतिन आणि मोदी…”
Amit Shah claims that there is no encroachment of even an inch by China
चीनकडून एका इंचावरही अतिक्रमण नाही; अमित शहा यांचा दावा; पहिले पंतप्रधान नेहरूंवर टीकास्त्र
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”

“क्रीडा संस्कृती निर्माण करणं हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक आहे”, असं सांगत पुढे अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींच्या खेळाच्या आवडीवरही भाष्य केलं. पंतप्रधान मोदींना खेळात प्रचंड रस असून त्यांनी याबाबत सातत्याने पाठिंबा दिल्याचं अनुराग ठाकूर म्हणाले. “पंतप्रधान खेळाडूंशी संवाद साधतात आणि त्यांना प्रोत्साहित करतात. हे खूप महत्वाचं आहे”, असं ते म्हणाले.