..आणि बॉम्बस्फोट सूत्रधाराच्या बहिणीला रडू कोसळले 

बॉम्बस्फोटांचा सूत्रधार हाशीमसह मधानियाचा दुसरा भाऊ मोहम्मद झेयीन हाशीम हाही स्फोटात ठार झाल्याचा संशय आहे.

श्रीलंकेच्या कलमुनाई शहरातील आणखी एका बॉम्बस्फोटात सहा मुलांसह १५ जण ठार झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी श्रीलंका लष्करी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार झहरान हाशीम याची बहीण मोहम्मद हाशीम मधानियाच्या घरी पोहोचले. मधानिया आणि तिचा पती शेरीफ नियास यांनी रुग्णालयात येऊन त्या १५ मृतांची ओळख पटवावी, असा गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचा आग्रह होता.

अधिकाऱ्यांनी आपल्याला छायाचित्रे दाखवावी, आपण ओळख पटविण्यास तयार आहोत, मात्र आपण तेथे जाऊन मृतदेह पाहू शकत नाही, असे मधानिया यांनी तमिळ भाषेत आपल्या पतीला सांगितले. तिची विनंती पतीने अधिकाऱ्याला सांगितली. मात्र अधिकारी ठाम होता. ठार झालेले तेच असतील तर तुम्ही त्यांना अखेरचे पाहणार आहात, कारण ते दहशतवादी आहेत, असे अधिकाऱ्याचे म्हणणे असल्याचे नियास याने मधानियास सांगितले तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. बॉम्बस्फोटांचा सूत्रधार हाशीमसह मधानियाचा दुसरा भाऊ मोहम्मद झेयीन हाशीम हाही स्फोटात ठार झाल्याचा संशय आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sri lanka bomb blast

ताज्या बातम्या