कोलंबो : श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित पौराणिक स्थळांच्या पर्यटनवाढीला प्रोत्साहन व चालना देईन, असे श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी सांगितले. सध्या श्रीलंका अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी श्रीलंका पर्यटनवाढीवर भर देऊ इच्छित आहे. या संदर्भात जयसूर्या यांनी भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागळे यांची भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय उच्चायुक्तालयाने ‘ट्वीट’ केले, की श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत व माजी दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी उच्चायुक्तांची भेट घेतली. भारत आणि श्रीलंकावासीयांदरम्यान संबंध दृढ करण्यावर व श्रीलंकेतील अर्थव्यवस्था सुधारण्याचा एक भाग म्हणून पर्यटनाला चालना देण्यावर या वेळी चर्चा झाली. यावर प्रतिक्रिया देताना जयसूर्या यांनी उच्चायुक्तांचे आभार मानले. त्यांनी ‘ट्विट’ केले, की आम्ही भारतीय पर्यटकांसाठी रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देण्यावर भर देणार आहोत. श्रीलंकेत रामायणाशी संबंधित ५२ पर्यटनस्थळे आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka will promote tourist destinations related to ramayana says sanath jayasuriya zws
First published on: 10-08-2022 at 04:54 IST