scorecardresearch

अंतरिम सरकार स्थापन करण्यास श्रीलंकेच्या अध्यक्षांचा नकार

श्रीलंकेतील अभूतपूर्व असे आर्थिक संकट हाताळण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन करण्याचे आंदोलकांचे आवाहन देशाचे पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी शनिवारी फेटाळून लावले.

कोलंबो : श्रीलंकेतील अभूतपूर्व असे आर्थिक संकट हाताळण्यासाठी अंतरिम सरकार स्थापन करण्याचे आंदोलकांचे आवाहन देशाचे पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी शनिवारी फेटाळून लावले. ‘वेगवेगळी धोरणे असलेले लोक एकमेकांशी नजरही मिळवत नसतील, तर अशा राजकीय संरचना काही उपयोगाच्या नाहीत,’ असे मत त्यांनी नोंदवले.

 ‘वेगवेगळी धोरणे असलेले लोक एकमेकांशी नजरही मिळवत नसतील, तर अंतरिम सरकारचा उपयोग काय? यासाठी करार व्हायला हवा, जो शक्य नाही. अंतरिम सरकारची आवश्यकता असेल, तर तसे केवळ माझ्या नेतृत्वाखालीच व्हायला हवे,’ असे ‘नेथ एफएम’ या रेडिओ केंद्राशी बोलताना राजपक्षे म्हणाले. विदेशी विनिमयाच्या संकटासाठी सरकारची धोरणेच जबाबदार असल्याचे सांगून,  सरकारविरोधी आंदोलक अध्यक्ष गोताबया राजपक्षे व पंतप्रधान राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sri lankan president refuses interim government financial crisis handle ysh

ताज्या बातम्या