हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत मुंबईत आणले जाईल असे समजते आहे. दरम्यान गायक सोनू निगम यांनी श्रीदेवी यांचा शेवटचा व्हिडिओ ट्विट केला आहे. श्रीदेवी त्यांच्या कुटुंबीयांसह दुबई येथे लग्नसोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्याच लग्न सोहळ्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या कोसळल्या. त्यातच त्यांचा अंत झाला.

श्रीदेवी ज्या विवाह सोहळ्यासाठी दुबईत गेल्या होत्या तिथलाच व्हिडिओ गायक सोनू निगम यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्या अत्यंत आनंदी आणि प्रसन्न दिसत आहेत. त्या जातील याची कल्पनाही कोणी केली नसावी असेच हा व्हिडिओ पाहून लक्षात येते आहे. दुर्दैवाने हा त्यांचा शेवटचा व्हिडिओ ठरला आहे.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
lok sabha election 2024 uddhav thackeray slams bjp over electoral bond issue
भाजप हाच ठगांचा पक्ष; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
donald trump dictator
“बराक ओबामा ISIS चे संस्थापक, मॉस्कोतील मृतांना तेच जबाबदार”, डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हीडिओ व्हायरल!

पाहा व्हिडिओ

श्रीदेवी यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे विविध फोटो, सिनेमातील प्रसंग पोस्ट करून अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत. तसेच या बातमीवर विश्वासच बसत नाही अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. याशिवाय श्रीदेवी यांच्या अनेक चाहत्यांनीही श्रीदेवी यांचे फोटो, गाणी आणि सिनेमातील प्रसंग ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. पहाटे ३ च्या सुमारास ही बातमी समोर आली त्यानंतर श्रीदेवी यांच्या मुंबईतील घरासमोरही चाहत्यांनी गर्दी केली. आता त्यांचा लग्नातील शेवटचा व्हिडिओही समोर आला आहे. या लग्नाला श्रीदेवी त्यांचे पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी असे तिघेजण गेले होते. याच लग्नाच्या दरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आला.