Gotabaya Rajapaksa left shrilanka : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी ( १३ जुलै ) पहाटे देशातून पलायन केले आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे आपली पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह मालदीवला गेल्याची माहिती आहे. श्रीलंकन हवाई दलाच्या विमानातून त्यांनी देश सोडला असल्याचे वृत्त आहे.

एका रिपोर्टनुसार, श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे आज पहाटे लष्कराच्या अँटोनोव्ह-32 विमानातून मालदीवला रवाना झाले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार अँटोनोव्ह-32 विमानात गोटाबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन अंगरक्षक होते.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच श्रीलंकेतील नागरिकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली होती. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत भीषण परिस्थिती श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे जबाबदार असल्याचा आरोप नागरीकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. श्रीलंकेतील चिघळत चाललेली परिस्थिती पाहता गोटाबाया राजपक्षे १३ जुलै रोजी आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी आपला राजीनामा अद्यापही दिला नाही. त्यापूर्वीच ते देशातून पलायन केले आहे.

हेही वाचा – भाजपा पदाधिकारी श्रीकांत देशमुखांवर महिलेचे गंभीर आरोप; हॉटेलमधील VIDEO आला समोर