मुलांना दत्तक घेण्याबाबत एकसमान आणि सर्वसमावेशक कायदा असावा, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे. यासाठी हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा तसेच बाल न्याय कायदा यांच्यात समन्वय साधून सुधारणा करण्याची गरज असल्याचेही संसदीय समितीने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराआधी शिवसेना खासदार विनायक राऊतांचा मोठा दावा, म्हणाले “काही आमदार…”

पालकत्व आणि दत्तक कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी कायदा विषयक स्थायी समितीची नुकताच बैठक पार पडली. यावेळी हिंदू दत्तक आणि देखभाल कायद्याच सुधारणार करण्याची गरज असून नवीन कायद्यात सर्व धर्म आणि LGBTQ समुदायासाठी एकसमान कायदा हवा, अशी शिफारस संसदीय समितीने केली. तसेच हा कायदा अधिक पारदर्शक असावा आणि यात नोकरशाहीचा हस्तक्षेप कमी असावा, असेही या समितीने म्हटले आहे.

हेही वाचा – मंत्रीमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले “अधिवेशन… ”

हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा आणि बाल न्याय कायदा या दोघांचेही काही फायदे आणि तोटे आहेत. हिंदू दत्तक आणि देखभाल कायद्यांतर्गत दत्तक घेण्याची प्रक्रिया सोप्पी आहे. मात्र, बाल न्याय कायद्यांतर्गत ही प्रक्रिया किचकट असल्याचेही समितीने म्हटले आहे.

More Stories onसंसदParliament
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Standing committee on law and personnel recommends uniform law on adoption for all religions and lgbtq community spb
First published on: 09-08-2022 at 11:57 IST