स्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेकडून १ कोटीचा दंड

स्टेट बँकेकडून १ कोटी रुपयांचा, तर स्टॅन्चार्टकडून १ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

RBI
(संग्रहित फोटो)

मुंबई : निर्देशांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सोमवारी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेसह, स्टँडर्ड चार्टर्ड बँक (स्टॅन्चार्ट) या विदेशी बँकेला दंड ठोठावला. स्टेट बँकेकडून १ कोटी रुपयांचा, तर स्टॅन्चार्टकडून १ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. आर्थिक अनियमितता व फसवणुकांचे वर्गीकरण आणि त्यांचे मध्यवर्ती बँकेला नियमित विवरण सादर करण्याच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. नियम पालनातील कुचराईमुळे ही कारवाई करण्यात आली असून, बँकेच्या ग्राहकांसोबतच्या व्यवहारावर त्यातून कोणताही परिणाम करण्याचा हेतू नाही, अशी स्पष्टोक्तीही मध्यवर्ती बँकेने निवेदनाद्वारे केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State bank fined rs 1 crore by rbi akp

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना