एपी, बैरुत

सीरियातील वेगवान घडामोडींनंतर बशर अल असाद यांना २४ वर्षांनंतर अध्यक्षपद सोडणे भाग पडले. त्यामुळे असाद घराण्याच्या ५० वर्षांचे राजकीय वर्चस्वाचा अस्त झाल्याचे मानले जात आहे.

Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
dharmaraobaba atram reaction on getting minister post
मी शंभर टक्के मंत्री होणार, पण अडीच वर्षाने, धर्मरावबाबा आत्राम म्हणाले…
Dhananjay Munde News
Dhananjay Munde : धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित, विचारताच म्हणाले; “मी राजीनामा….”
loksatta readers feedback
लोकमानस: सारेच बरबटलेले, कोणाला वगळणार?
Lkoksatta samorchya bakavarun Manmohan Singh career
समोरच्या बाकावरून: ‘अपघाती’ अर्थमंत्र्याची ‘पोलादी’ कारकीर्द
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका

असाद यांनी २०००मध्ये पहिल्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ते केवळ ३४ वर्षांचे होते. त्यांचे वडील हाफिज अल असाद हे १९७१पासून २०००पर्यंत देशाचे अध्यक्ष होते आणि ते कठोर शासक म्हणून ओळखले जात. बशर यांनी वडिलांकडून सत्ता हाती घेतल्यानंतर ते सुधारणावादी धोरणे राबवतील अशी आशा व्यक्त करण्यात आली होती.

हेही वाचा >>>Abu Julani : सीरियातून राष्ट्राध्यक्षांना पळवून लावणारा अबू मोहम्मद अल जुलानी कोण आहे?

मात्र, मार्च २०११मध्ये अरब स्प्रिंगदरम्यान सरकारविरोधी निदर्शने चिरडून टाकण्यासाठी असाद यांनी क्रूर पावले उचलली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता ओसरली. आपली सत्ता टिकवताना पश्चिम आशियाच्या इतर देशांमधील संघर्षामध्ये सहभागी होणाऱ्या देशांचे सैन्य, सशस्त्र बंडखोर इत्यादींना त्यांनी सीरियाचा भूभाग वापरू दिला.

सीरियात मार्च २०११च्या निदर्शनांचे रुपांतर नागरी युद्धामध्ये झाले. सरकारने मोठ्या प्रमाणात उघडलेल्या स्थानबद्धता केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात छळ आणि बेकायदा हत्या झाल्याचे आरोप झाले. या काळात देशभरात जवळपास पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आणि एक कोटीपेक्षा जास्त लोक बेघर झाले.

Story img Loader