न्यूयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात सॅन होजे शहरामधील एका उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीस गेला आहे. ‘पार्क, रिक्रिएशन आणि नेबरहूड सव्र्हिसेस’ने शुक्रवारी ‘ट्विटर’द्वारे ही माहिती दिली. स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनी ‘केटीव्हीयू’च्या वृत्तानुसार या पुतळय़ाची चोरी नेमकी कधी झाली, याचा तपशील मिळू शकलेला नाही.
‘सिस्टर सिटी’ मोहिमेंतर्गत सॅन होजे आणि पुण्याचे संबंध प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे शहराने हा पुतळा सॅन होजेला भेट दिला होता. पुतळा चोरीस गेल्याचे शहरवासीयांना खूप दु:ख झाले आहे. या संदर्भात जी अद्ययावत माहिती मिळेल, ती आपल्याला कळवत राहू. अधिकारी तपास करत आहेत. नागरिकांकडूनही या संदर्भातील माहिती मागवल्याचेही या विभागाने स्पष्ट केले.