महिलाच नाही तर पुरुषांसाठीही बंधने; तालिबानने अशा गोष्टीची केली सक्ती की पुरुषांचेही झाले वांदे

राजधानी काबूलमधील अनेकांना तालिबान्यांकडून धमकावलं जात असल्याची माहिती समोर आली असून आता यामुळे पुरुषांच्या अडचणी वाढल्यात.

taliban
अनेक ठिकाणी यासंदर्भात इशारा देणारी पत्रकं तालिबान्यांनी लावली आहेत (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स)

अफगाणिस्तानमधील हेल्मांड प्रांतामधील केशकर्तनालयांसाठी तालिबानने एक आदेश जारी केला आहे. या आदेशामध्ये यापुढे कोणाचीही दाढी करु नये तसेच दाढी ट्रीम देखील करु नये असं तालिबानने म्हटलं आहे. नाभिक म्हणून काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने याचं उल्लंघन केल्यास त्याला कठोर शिक्षा करण्यात येणार असल्याचा इशारा या आदेशात देण्यात आल्याचं बीसीसीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

राजधानी काबूलमधील अनेक नाभिकांनी आम्हालाही अशाप्रकारच्या धमक्या मिळाल्याचं म्हटलं आहे. तालिबानकडून या धमक्या दिल्या जात असल्याचं नाभिकांचं म्हणणं आहे. मागील कार्यकाळामध्ये लागू केलेले कठोर नियम लागू करणार नाही आणि पूर्वीपेक्षा जास्त चांगल्यापद्धतीने आम्ही कारभार करु अशा शब्द देशातील नागरिकांना दिल्यानंतर आता दाढी करण्यासारख्या अत्यंत खासगी गोष्टीमध्येही तालिबानकडून बंधने घातली जात असल्याचं चित्र दिसत आहे. आता या दाढी ट्रीम न करण्याच्या सक्तीमुळे अनेक पुरुषांसमोर दाढीची देखभाल कशी करावी यासंदर्भातील मोठा प्रश्न निर्माण झालाय.

तालिबान्यांनी नाभिकांसाठी हेल्मांडमध्ये जागोजागी पत्रकं लावली आहेत. “कोणालाही तक्रार करण्याचा हक्क नाहीय,” असं यावर लिहिलं आहे. तालिबान्यांनी या नाभिकांना आधीच दाढी करण्याची सेवा थांबवण्याचा इशारा दिलाय. तसेच आम्ही गुप्तपणे तुमच्या पाळत ठेऊन तुम्हाला रंगेहाथ पकडू आणि कठोर शिक्षा करु. असं झाल्यास त्याला तुम्हीच सर्वस्वी जबाबदार असाल असं तालिबानने या नाभिकांना सांगितलं आहे.

बीबीसीला काबूलमधील एका लोकप्रिय केशकर्तनालयाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, “तालिबान सरकारमधील एका व्यक्तीने फोन करुन अमेरिकन पद्धतीचं अनुकरण करणं थांबवा,” अशी धमकी दिली आहे.

तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूलमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आणि १६ ऑगस्टला राजधानीवर ताबा मिळवत सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर महिन्याभराने येथील व्यवहार हळूहळू सुरळीत होऊन पुरुष केस कापण्यासाठी, दाढी करण्यासाठी केशकर्तनालयांमध्ये येत आहेत. वेगवेगळ्या फॅशनच्या हेअरस्टाइल आणि दाढी ट्रीमींगला तरुणांचं प्राधान्य असतानाच आता तालिबान्यांकडून याला विरोध केला जातोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stop following american styles taliban ask barbers to end shaving beard trimming services scsg

Next Story
…अन् आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला धक्का मारून रुग्णवाहिकेला करून दिली वाट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी