पीटीआय, कैरो
होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या अमेरिकेच्या मानवरहित नौकेवर हल्ला केल्याचा दावा इराणने रविवारी केला. मात्र, अमेरिकी लष्कराने हा दावा ‘पूर्णपणे खोटा’ असल्याचे सांगत तो फेटाळून लावला. या घटनेमुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने तीन इराणी तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याचे जाहीर केल्यानंतर दुसर्यावच दिवशी इराणकडून हा दावा करण्यात आला. अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांना बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई केल्याचे अमेरिकेने म्हटले होते. यापूर्वी इराणकडून समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आले होते. आता लष्करी लक्ष्यांवरील हल्ल्यांमुळे संघर्ष अधिक धोकादायक टप्प्यात पोहोचत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.