नवी दिल्ली : हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि सत्याचा विजय आहे. तसाच तो ६२ कोटी शेतकऱ्यांच्या इच्छाशक्तीचा आणि या लढ्यात शहीद झालेल्या सातशेहून अधिक शेतकऱ्यांच्या बलिदानाचाही विजय आहे. शेतकऱ्यांच्या लढ्यातून भाजप सरकार भविष्यासाठी काही धडे घेईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार यापुढे अहंकार, हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यावर लक्ष केंद्रीत करेल. त्याचबरोबर किमान आधारभूत किंमत निश्चिात करेल. तसेच यापुढे असे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी राज्य सरकारे, शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांशी चर्चा करेल, अशी अपेक्षाही सोनिया यांनी व्यक्त केली.

देशाच्या अन्नदात्यांनी सत्याग्रहाद्वारे अहंकाराला नमवले आहे. त्यामुळे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा अन्यायाविरोधातील विजय आहे. आंदोलनात शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्यांचा हा पराभव आहे.   राहुल गांधी, खासदार, काँग्रेस नेते