scorecardresearch

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; १९ वर्षीय तरुणाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; अश्लील फोटोही केले व्हायरल

एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

rape
प्रातिनिधीक छायाचित्र

एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज द्विवेदी (१९) असं या आरोपीचं नावं असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. याप्रकरणी मुलींच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीला पकडण्यासाठी पथकं रवाना केली असल्याची माहिती गुरुग्राम पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – संरक्षणासाठी ५.९४ लाख कोटींची तरतूद ; शस्त्रास्त्र खरेदीसाठी १.६२ लाख कोटी

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका मुलीची उत्तर प्रदेशातील राज द्विवेदी नावाच्या मुलाशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर आरोपीने मुलीला गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओदेखील काढले. मात्र, त्यानंतर त्याने पुन्हा हॉटेलमध्ये भेटण्यासाठी मुलीवर दबाव आणला. मात्र, मुलीने नकार दिल्यानंतर त्याने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच मुलीच्या आईलादेखील पाठवले.

हेही वाचा – Budget 2023: मॅनहोलमुळे होणाऱ्या जीवितहानीला बसणार आळा; मशीनद्वारे होणार सफाई

दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी राज द्विवेदी विरोधात पॉक्सो आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा विद्यार्थी असून त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलीस पथकं तयार करण्यात आली असल्याची माहिती गुरूग्राम पोलिसांतील एसएचओ पूनम सिंग यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 11:11 IST