गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका प्राथमिक विद्यालयात दलितांनी शिजवलेले अन्न खाण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिल्याचा आरोप कंत्राटदाराकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिक्षण आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांची आणि शिक्षकांची तातडीची बैठक घेतली. मात्र, विद्यालय प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा- फोटोच्या नादात कोसळला धबधब्यात, तीन दिवसांपासून शोध सुरू, मित्राने शूट केला व्हिडिओ

कंत्राटदाराकडून आरोप

इंडियन एक्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. हे जेवण पुरवणारे कंत्राटदार दलित समूदायातून येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून हे अन्न शिवजले जाते. त्यामुळे हे अन्न खाण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी त्यांना १०० विद्यार्थ्यांचे जेवण बनवण्यास सांगितले होते. मात्र, केवळ सात विद्यार्थ्यी जेवण करण्यासाठी पोहोचले. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात नाईलाजाने मध्यान्ह भोजन बनवणे बंद करावे लागल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. या अगोदरचा कॉन्ट्रैक्टर ओबीसी समाजातील असल्यामुळे असा प्रकार कधीच घडला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

हेही वाचा- दुर्दैवाचा फेरा: सर्पदशांने मृत्यू पावलेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणाचंही सर्पदंशानेच निधन; गावात हळहळ

विद्यालय प्रशासनाकडून खुलासा
विद्यालय प्रशासनाने या आरोपाचे खंडण करत याबाबत खुलासा केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी सरकारकडून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. शाळेत १५३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी अनेक विद्यार्थी आपल्या घरुन जेवणाचा डबा घेऊन येतात. शाळेत मिळणाऱ्या जेवणाऐवजी त्यांना घरून आणलेला डबा खायला आवडत असल्याचे स्पष्टीकरण विद्यालय प्रशासनाने दिले आहे. जर मुलांना वाटलं तर ते शाळेतील अन्न खातील. मात्र, शाळेत शिजवलेले अन्न खाण्यासाठी आपण त्यांना जबरदस्ती करु शकत नसल्याचे गावच्या संरपंचांनी म्हणले आहे.