महामारी ठरली वजनवाढीसाठी पोषक; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती

महामारीच्या दुष्परिणामांपासून आपल्या मुलांना वाचवणं हे पालकांसाठी आव्हानात्मक आहे.

राजधानी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयाने केलेल्या महिनाभराच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोविड-१९ महामारीच्या काळात मुलांचे वजन वाढू लागले. अभ्यासात सर्वेक्षण केलेल्या अर्ध्याहून अधिक मुलांचे वजन जास्त असल्याचे आढळून आले.

सर गंगाराम हॉस्पिटलने १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणाचे निकाल शनिवारी जाहीर करण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, साथीच्या आजाराच्या काळात लठ्ठपणाचा धोका मोजण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

निवेदनात म्हटले आहे की, ‘निकाल धक्कादायक होते. सर्वेक्षण केलेल्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिली की त्यांच्या मुलांचे वजन १० टक्के वाढले आहे. याचे श्रेय बहुतांशी बैठी जीवनशैली आणि सहज उपलब्ध फास्ट फूड यांना दिले जाते. ताणतणाव आणि असामान्य झोप-जागण्याच्या चक्रांमुळे खाण्याच्या सवयींमध्ये बदल दिसून आला.

निवेदनानुसार, १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १,३०९ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Study of childrens weight gain during the kovid epidemic vsk

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या