सुदर्शन साहू, सिंधुताई सपकाळ आदींना पद्म पुरस्कार प्रदान

सुदर्शन साहू हे मूळ ओडिशातील असून त्यांना पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली : प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन साहू,  लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्यासह अन्य मान्यवर व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात मंगळवारी पद्म पुरस्कार प्रदान केले.

मंगळवारी पुरस्कार प्रदान सोहळ्याचा दुसरा टप्पा पार पडला. दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुदर्शन साहू हे मूळ ओडिशातील असून त्यांना पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले. सिंधुताई  सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुमित्रा महाजन या आठ वेळा खासदार होत्या.  त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागरी सेवा विभागात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता, तो त्यांच्या पत्नीने स्वीकारला.

 आसामचे सामाजिक कार्यकर्ते लखिमी बारूआ, हरयाणाच्या कुरूक्षेत्र येथील हिंदूी साहित्यिक प्रा. जयभगवान गोयल, राजस्थानचे लोकगायक लखा खान, मुंबईच्या कर्नाटकी संगीत गायिका जयश्री रामनाथ, डेहराडूनचे अस्थिशल्यविशारद भूपेंद्र कुमार सिंह संजय, श्रीनगर येथील हिंदूीचे प्राध्यापक व पत्रकार चमनलाल सप्रू यांचा सन्मानार्थीमध्ये समावेश होता. राजस्थानातील पाली लेखक अर्जुन सिंह शेखावत, संस्कृत व्याकरण तज्ज्ञ राम यत्न शुक्ला, दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सिंह शंटी, अ‍ॅथलिट सुधा सिंह, हिंदूी लेखिका मृदुला सिन्हा (मरणोत्तर),  पश्चिम बंगालचे सामाजिक कार्यकर्ते गुरू मा कमाली सोरेन, आदिवासी लोकसंस्कृती विद्वान भोपाळ कपील तिवारी यांनाही सन्मानित करण्यात आले.

फर्नाडिस, जेटली यांचा गौरव

सोमवारी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान झालेल्यांत माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नाडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मॉरिशसचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध जगन्नाथ यांचा समावेश आहे. फर्नाडिस यांच्या पत्नी लीला कबीर यांनी पुरस्कार स्वीकारला. जेटली यांच्या वतीने त्यांच्या पत्नी संगीता जेटली यांनी पुरस्कार स्वीकारला, सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांनी पुरस्कार स्वीकारला.

इतर मानकऱ्यात माजी संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर (मरणोत्तर), मिहद्र समूहाचे अध्यक्ष आनंद मिहद्र, सुंदरम क्लेटन समूहाचे वेणू श्रीनिवासन, नागालँडचे माजी मुख्यमंत्री एस.सी जमीर यांना पद्मभूषणने गौरवण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sudarshan sahoo sindhutai apkal awarded padma awards zws

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या