भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी एस. सुधाकर रेड्डी यांची फेरनिवड करण्यात आली. तर गुरुदासदास गुप्ता यांची सहसरचिटणीसपदी निवड झाली.
केंद्रीय समितीत डी राजा, शमीम फैजी, अमरजित कौर, अतुलकुमार अंजन, रामेंद्रकुमार, पनिन रवींद्रन व डॉक्टर के नारायणा यांची निवड झाली आहे. नऊ सदस्यीय केंद्रीय नियंत्रण आयोगाखेरीज, ३१ जणांची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये २० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाच्या पाच दिवसांच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. डाव्यांची एकी व धर्मनिरपेक्षतेचे जतन करणे गरजेचे असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार जनविरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोपही रेड्डी यांनी केला.