इराणी दूतावासाजवळ आत्मघातकी हल्ला,२३ ठार

इराणच्या येथील दूतावासावर दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान २३ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये इराणच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

इराणच्या येथील दूतावासावर दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात किमान २३ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये इराणच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याचाही समावेश आहे. इराण समर्थक म्हणून गणल्या जाणाऱ्या जनाह या शियाबहुल तसेच हेजबुल्ला गटाचे वर्चस्व असलेल्या भागात हा हल्ला झाला.
इराणच्या दूतावासावर, करण्यात आलेल्या या हल्ल्यांत दूतावासाची   तीन मजली इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या हल्ल्यामागे नेमके कोण आहे हे स्पष्ट होऊ शकले नव्हते, मात्र हेजबुल्ला गटाचे वर्चस्व असलेल्या भागांना लक्ष्य करून सुन्नी मूलतत्त्ववाद्यांनी हा हल्ला केला असावा, असा संरक्षणतज्ज्ञांचा तर्क आहे.

हल्ला सुडापोटी?
सीरियामध्ये गेली काही वर्षे नागरी युद्ध सुरू आहे. यामध्ये शियापंथीय हेजबुल्ला गट सीरियाचे अध्यक्ष बशर अल् असद यांचे समर्थक म्हणून सुन्नींविरोधात लढत आहेत. त्याचा सूड उगवणे हाच या हल्ल्यामागील उद्देश असल्याचे म्हटले जात आहे.
हल्ल्यामागे कोण याचा अंदाज आहे..
या हल्ल्यामागे नेमके कोण आहे, याचा आम्हाला अंदाज आहे पण आम्ही सध्या त्यांचे नांव घेणार नाही. आम्हाला या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे, याचेही भान आहे, असे इराणच्या लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले.

दुसरा हल्लाही दूतावासापासून जवळच
मंगळवारी करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये किमान २३ जण ठार तर १४६ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लेबेनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. तर मृतांमध्ये इराणी दूतावासातील शेख इब्राहिम अन्सारी या सांस्कृतिक कार्याधिकाऱ्याचा समावेश असल्याचे येथील इराणच्या राजदूतांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुसरा हल्लाही दूतापासून अवघ्या काही मीटर परिसरात करण्यात आला. या हल्ल्यामुळे अनेक वाहनांच्या ठिकऱ्या उडाल्या. पहिला हल्ला हा मोटरसायकलस्वाराने केलेला तर दुसरा कारस्फोट असावा़

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suicide blasts near iran embassy in beirut kill