Suicide bomber attacks us diplomatic site in saudi: सौदी अरेबियात अमेरिकी दुतावासाबाहेर आत्मघातकी हल्ला

दहशतवादी या रुग्णालयात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना तेथील दोन सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले.

अमेरिकी दुतावासाबाहेर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहर सोमवारी सकाळी आत्मघातकी हल्ल्याने हादरले. अमेरिकी दुतावासाबाहेर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावर मदतकार्य सुरू असून, जखमींचे नेमका आकडा अद्याप कळू शकलेला नाही. सौदीतील वेबपोर्टलच्या माहितीनुसार, हल्ला झालेल्या ठिकणी विविध देशांचे दुतावास आहेत. दहशतवादी एका कारमधून आला होता. अमेरिकेच्या दुतावासानजिक एक मोठं रुग्णालय देखील आहे. दहशतवादी या रुग्णालयात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना तेथील दोन सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले. यानंतर दहशतवाद्याने आत्मघातकी बॉम्बने स्वत:ला उडवून दिले. बॉम्बस्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. हल्ल्यात केवळ दहशतवादीच जागीच ठार झाला व इतर कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Suicide bomber attacks us diplomatic site in saudi city of jeddah