Sukesh Chandrasekhar Letter to Nirmala Sitharaman : दिल्लीमधील तिहार तुरुंगात कैद असलेला ठग सुकेश चंद्रशेखरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सुकेशने अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना एक पत्र लिहिलं आहे. सुकेशने त्याच्या परदेशातील उत्पन्नाची माहिती या पत्राद्वारे दिली आहे. तसेच २०२४-२५ च्या भारत सरकारच्या योजनेच्या नियमांनुसार आपलं उत्पन्न जाहीर करण्याबाबत आणि त्यावरील कर भरण्याबाबात उल्लेख केला आहे. सुकेशला त्याच्या परदेशातील उत्पन्नावर ७,६४० कोटी रुपये कर भरायचा आहे. त्याच्याकडे जवळपास २२,४१० कोटी रुपयांची परदेशी संपत्ती असून त्यावर त्याला कर भरायचा आहे. पत्रात त्याने म्हटलं आहे की २०२४-२५ या आर्थिक वर्षात दोन परदेशी कंपन्यांद्वारे ही कमाई केली आहे.

सुकेशने त्याच्या पत्रात म्हटलं आहे की एलएस होल्डिंग्स इंटरनॅशनल (नेवाडा, अमेरिका) व स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन (ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स) या दोन कंपन्यांच्या माध्यमातून त्याने ही बक्कळ कमाई केली आहे. या दोन्ही कंपन्या २०१६ पासून कार्यान्वित आहेत. या दोन्ही कंपन्या ऑनलाइन व ऑफलाइन गेमिंग, तसेच बेटिंगच्या क्षेत्रात काम करतात. सुकेशने म्हटलं आहे की या कंपन्या अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई व हाँगकाँगसारख्या अनेक देशांमध्ये पसरल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल २.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी कमाई केली आहे.

पोटगीची रक्कम थकविल्याने पतीची कारागृहात रवानगी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Anajli Damania on dhananjay Munde
“…आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याच”, भर पत्रकार परिषदेत पुरावे सादर केल्यानंतर अंजली दमानियांची मागणी!
finance minister Nirmala Sitharaman
प्रतिशब्द : भरवसूली चोहिकडे!
income tax
छोटी…छोटी सी बात!
Finance Minister Nirmala Sitharaman wearing a Madhubani saree during Union Budget 2025 presentation
Union Budget 2025: निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेली मधुबनी साडी आणि रामायण यांचा नेमका काय संबंध?
ST seeks UPI solution to holiday money dispute Mumbai news
सुट्या पैशांच्या वादावर एसटीकडून ‘यूपीआय’चा तोडगा; प्रतिसादामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ
gadchiroli tribal couple
मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा; आदिवासी दाम्पत्याची व्यथा, तीन दिवसांपासून उपाशी, पत्नीचे मंगळसूत्र मोडले

हे ही वाचा >> सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी, अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस

सुकेशला भारतात गुंतवणूक करायची आहे?

सुकेश केवळ कर भरण्याबाबत बोलून थांबलेला नाही तर, त्याने त्याचे पुढील मनसुबे देखील जाहीर केले आहेत. त्याने त्याच्या पत्रात म्हटलं आहे की त्याला भारतात तंत्रज्ञान व ऑनलाइन स्किल गेमिंगच्या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. त्याने म्हटलं आहे की “मी कमावलेले सर्व पैसे हे कायदेशीर आहेत. मी कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळवली आहे. मी व माझ्या कंपन्यांनी नेहमीच आंतरराष्ट्रीय बँकिंग कायद्यांचं पालन केलं आहे.

हे ही वाचा >> संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा

सुकेश चंद्रशेखर हा कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार, पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपांखाली तिहार तुरुंगात कैद आहे. २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचालनालय (ईडी) त्याची चौकशी करत आहे. त्याने रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर्स शिविंदर सिंह व मालविंदर सिंह यांच्या पत्नीची २०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यासह दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा व इतर तपास यंत्रणा देखील त्याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास करत आहेत. यासह सुकेश चंद्रशेखर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबरोबरच्या त्याच्या नात्यामुळे प्रसिद्धीझोतात आला होता. त्याच्याविरोधात वेगवेगळ्या तपास यंत्रणांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

Story img Loader