सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री?; काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा; राहुल गांधींच्या भेटीगाठी

अरुणा चौधरी आणि भारत भूषण आशु हे पंजाबचे पुढील उपमुख्यमंत्री असतील.

sukhjindar singh
सुखजिंदर सिंग रंधावा (फोटो फेसबुकवरून साभार)

पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेस हायकमांडकडून या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे. तसेच अरुणा चौधरी आणि भारत भूषण आशु हे पंजाबचे पुढील उपमुख्यमंत्री असतील. तर, अरुणा चौधरी या दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतील असं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान, राहुल गांधी आणि अंबिका सोनी विधानसभेतील काँग्रेस नेते आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे. तर काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याशी भेटीसाठी वेळ मागितल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

अमरिंदर सिंग यांचा राजीनामा..

पक्षश्रेष्ठींना आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी फोन करुन आपल्याला सॉरी म्हणाल्याचा दावा केला आहे. तर राजीनामा देण्यापूर्वी सिंग यांनी गांधी यांना पत्र लिहिलं असल्याचंही आता समोर आलं आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या काही तासांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात गेल्या पाच महिन्यांच्या राजकीय घडामोडींमुळे दुःखी असल्याचे जाहीर केले. या पत्रात सिंग यांनी म्हटलं आहे की, नवज्योत सिंग सिद्धू यांच्या कडव्या हल्ल्यामुळे ते राजीनामा देत आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या राजकीय घडामोडी पंजाबच्या समस्या आणि राज्याच्या गरजांवर आधारित नाहीत हेही सिंग यांनी अधोरेखित केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sukhjinder singh randhawa likely to be a cm of punjab hrc