पीटीआय, नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचलचे नवे मुख्यमंत्री होतील, असे पक्षातर्फे शनिवारी घोषित करण्यात आले. पक्षश्रेष्ठींनी हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथून निवडले गेलेले ५८ वर्षीय आमदार सुखू यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केले आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी मुकेश अग्निहोत्री यांची निवड झाली असून ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उद्या, रविवारी होणार असल्याचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी जाहीर केले.

हिमाचल प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष सुखू हे चार वेळा आमदारपदी निवडून गेले आहेत. ते पक्षनेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानले जातात. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सहा वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेले दिवंगत वीरभद्र सिंह यांचे विरोधक अशी त्यांची ओळख आहे. शनिवारी संध्याकाळी उशिरा सिमला येथे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत सुखू यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. विधिमंडळ पक्षाची २४ तासांतील ही दुसरी बैठक असेल. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत आमदारांनी पक्षाध्यक्षांना विधिमंडळ पक्षनेता (मुख्यमंत्री) निवडण्याचे अधिकार देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Chief Minister Eknath Shinde, Criticizes India Alliance, Leaderless and Agenda less india alliance, buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, eknath shinde shivena, election campaign, prataprao jadhav, marathi news, politics news,
“इंडिया आघाडीचा ना झेंडा, ना अजेंडा,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका; म्हणाले…
narayan rane
शिंदेंची रत्नागिरीत ताकद नाही; राणेंचा दावा
internal conflict in shiv sena dispute between mp rahul shewale and mla sada saravankar
दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेत वाद; विभागप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा

काँग्रेसने ६८ पैकी ४० विधानसभा जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवल्याने हिमाचल प्रदेशमधील भाजपची सत्ता संपुष्टात आली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष व वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह व विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. त्यासाठी या इच्छुकांनी मोर्चेबांधणी चालवली होती. विधिमंडळ पक्षाची म्हणजे नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांची बैठक शनिवारी संध्याकाळी विधानसभा भवनातच होणार असल्याची माहिती कुल्लूचे आमदार सुंदर सिंग ठाकर यांनी दिली. याआधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाचे निरीक्षक हिमाचलला पाठवले असल्याचे सांगितले होते. 

हिमाचलप्रमाणे कर्नाटकमध्येही एकजुटीने काम करा : खरगे

कलबुर्गी (कर्नाटक) : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उद्या, रविवारी (१२ डिसेंबर) होणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी कर्नाटकात पत्रकारांना सांगितले. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कलबुर्गी या गावाला खरगे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी कर्नाटकमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले, की हिमाचल प्रदेशमध्ये दहा कलमी कार्यक्रम देऊन काँग्रेसने विजय मिळवला. तेथे आपण चांगल्या बहुमताने विजयी झालो आहोत. उद्या तेथे आपल्या सरकारचा शपथविधी सोहळा आहे. त्यामुळेच मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी गेलो होतो. येथे पक्षाच्या मोठय़ा मेळाव्यात बोलताना खरगे म्हणाले, की सर्व सबंधितांशी चर्चा केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उद्या, रविवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचलप्रमाणे कर्नाटकमध्येही विजय मिळवण्यासाठी सर्वानी हातमिळवणी करून एकजुटीने काम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मला कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार हवे आहे.