हार्दिक पटेलला सनी लिओनीच्या सन्मानाची काळजी !

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलने पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनीची बाजू मांडली

आपल्या राजकीय भाषणांमधून विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलने पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनीची बाजू मांडली आहे. ज्या दृष्टीकोनाने न​र्गिस, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांसारख्या अभिनेत्रींकडे पाहिलं जातं त्याच नजरेनं सनी लिओनीलाही पाहावं असं हार्दिक पटेलनी म्हटलं आहे.

इंदुरमध्ये पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले, ज्या दृष्टीकोनाने आपण न​र्गिस, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्याकडे पाहतो त्याच दृष्टीकोनाने सनी लिओनीकडे पाहण्यात काय अडचण आहे? आपण सनी लिओनीला चुकीच्या नजरेनं का बघावं? जर पॉर्नस्टार म्हणूनच आपण अजूनही सनी लिओनीला पाहणार असू तर हा देश कधी बदलू शकत नाही, असं पटेल म्हणाले. एक अभिनेत्री म्हणून आदर मिळावा अशी तिचीही इच्छा असेल, असं पटेल म्हणाले.

यावेळी बोलताना हार्दिक पटेलने भाजपावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. भाजपा म्हणजे ‘सत्ता लालची पार्टी’ असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच जर २०१९ मध्ये निवडणुकांत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्यानंतर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत असं ते म्हणाले. यामागे काय कारण असू शकतं अशी विचारणा केली असता पटेल म्हणाले, ज्या पद्दतीने कर्नाटक निवडणुकांनंतर राज्यपालांनी बहुमत असतानाही कांग्रेस आणि जेडीएसला सत्तास्थापनेची संधी न देता भाजपाला बोलावलं त्यावरुन देशात घटना संपवण्याची तयारी सुरू असल्याचं ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sunny leone deserves respect like any other mainstream actress says hardik patel