पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजित सिंह पाटील आणि शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर या दोघांमध्ये कोण बाजी मारणार? यावरून कार्यकर्त्यांमध्ये आता पैजा लागू लागल्या आहेत. उस्मानाबाद शहरानजीक असलेल्या राघुचीवाडी या गावातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करारनामा करून दुचाकीची पैज लावली आहे. या दोघांनी केलेला करारनामा सध्या समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल झाला आहे.

उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. पहिल्या दिवसापासून एकमेकांविरोधात राळ उठविणारे कार्यकर्ते मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील अद्याप शांत झालेले नाहीत. समाजमाध्यमावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तावातावाने आपण विजयी होणार, असे दावे-प्रतिदावे करीत आहेत. राघुचीवाडी येथील या दोन कार्यकर्त्यांनी करारनाम्यानुसार लावलेली दुचाकीची शर्यत त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
Gujarat Congress chief Arjun Modhwadia joins BJP and attacks on congress leader
“पक्ष चालवणं म्हणजे अर्धवेळ नोकरी नव्हे”; गुजरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडताना दिल्या कानपिचक्या!

रघुचीवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शंकर मोरे यांनी सेनेचे ओम राजेनिंबाळकर निवडून आल्यास आपल्या मालकीची नवी कोरी दुचाकी शिवसेनेचे बाजीराव करवर यांना देणार असल्याचे करारनाम्यानुसार लिहून दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते बाजीराव करवर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार राणा जगजित सिंह पाटील निवडून आल्यास आपल्या मालकीची दुचाकी मोरे यांच्या नावे करणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोघांनी शनिवार, २० एप्रिल रोजी १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीद्वारे करारनामा केला आहे. निवडणूक निकालानंतर २४ मे रोजी ही प्रक्रिया आपण पार पाडणार असल्याचे त्यांनी करारनाम्यात नमूद केले आहे. त्यामुळे या दोघांचा करारनामा सध्या समाज माध्यमात चांगलाच चर्चेत आहे.