१ एप्रिल २०२० पासून ‘ही’ वाहने होणार बंद 

विक्री बंद झाल्यानंतर कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ही वाढ एक ते दिड लाखांपर्यंत होईल असे बोलले जात आहे. 

वाहनांमधून होणारे प्रदूषण हे पर्यावरणाला हानिकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. १ एप्रिलपासून भारतात भारत स्टेज-४ म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या वाहनांना पर्याय म्हणून १ एप्रिल २०२० नंतर भारत BS-6 प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे. एप्रिल २०१७ मध्ये BS-4 वाहनांची विक्री अनिवार्य करण्यात आली होती.  आताच्या BS-4 वाहनांची विक्री बंद झाल्यानंतर कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ही वाढ एक ते दिड लाखांपर्यंत होईल असे बोलले जात आहे.

BS-6 मुळे कार बनविण्याच्या खर्चात वाढ होणार आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात भारतात दिल्लीमध्ये BS-6 सुविधेच्या कारमध्ये इंधन भरण्याची सुविधा पहिल्यांदा दिल्लीत उपलब्ध झाली. मात्र या नव्या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्याला मोठा हातभार लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपन्यांनी आता आपल्याकडे असलेला BS-4 चा स्टॉक लवकर क्लिअर करावा असे कंपन्यांना सांगण्यात आले आहे. जे ग्राहक आधीपासून BS-4 किंवा BS-3 च्या कार वापरतात त्यांना कोणत्या अडचणी येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Supreme court bans sale of bs iv vehicles in india from 1st april

ताज्या बातम्या