२००२ साली झालेल्या गुजरात दंगली (Gujarat Violence Case) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (narendra modi) क्लिन चीट दिली. या अगोदर एसआयटीनेही पंतप्रधान मोंदींसह इतर लोकांना क्लिन चीट दिली होती. याविरोधात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी (Ehsan Jafri) यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत पंतप्रधान मोदींना क्लिन चीट दिली आहे.


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती. दोन्ही पक्षांचं म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर न्यायलयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज एसटीआयच्या अहवालावर शिक्कामोर्तब करत झाकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या याचिकेत योग्यता नसल्याचे न्यायालयाने म्हणणे आहे.

काय आहे दंगल प्रकरण?
२८ फेब्रुवारी २००२ साली गुजरातमधील अहमदाबाद येथे दंगल झाली होती. या दंगलीत एहसान जाफरीसह ६९ जणांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. तपासानंतर एसटीआयने नरेंद्र मोदींसह ६४ जणांना क्लिन चीट दिली होती. एसटीआयच्या या अहवालाविरोधात झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी झाकिया यांची बाजू न्यायलयात मांडली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली.