सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे. सुरुवातीला हे लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबवर होणार आहे आणि नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे. ‘बार अँड बेंच’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटनापीठासमोरील या खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा निर्णय सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘फूल कोर्ट मीटिंग’मध्ये घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीवेळी लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. त्यावेळी ते नॅशनल इन्फॉर्मेटिंक्स सेंटर या सरकारी संस्थेच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाने १३ दिवसांत निकाली काढली पाच हजार प्रकरणं

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायालयातील पेंडीग प्रकरणं निकाली काढण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी अवघ्या १३ दिवसांत पाच हजारांच्यावर प्रकरणं निकाली काढली आहेत.

बार अ‍ॅंण्ड बेंच या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १३ दिवसांत एकूण ५११३ प्रकरणं निकाली काढली आहेत. यामध्ये २८३ नियमित, १२१२ हस्तांतरण केलेल्या तर ३६१८ अन्य प्रकरणांचा समावेश आहे. ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित या पदभार स्वीकारल्यानंतर न्यायप्रक्रियेत जे बदल केलेत त्यापैकी हा एक बदल आहे.

हेही वाचा : SC मध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे खटला सुरु असताना CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणतात, “आत्तापर्यंतचा…”

याशिवाय सर्वोच्च न्यायालयात कामांच्या दिवशी नियमीत प्रकरणाच्या सुनावणी दुपारी १०.३० ते १ दरम्यान घेण्यात येत आहेत. तर अन्य दिवशी दुपारी २ ते ४ या वेळात इतर प्रकरणांच्या सुनावणी घेण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court going to live stream maharashtra crisis case and other constitution bench hearings pbs
First published on: 21-09-2022 at 13:07 IST