‘तहलका’चे माजी संस्थापकीय संपादक तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाकडून आज(मंगळवार) जामीन मंजूर करण्यात आला आहे.
तेजपालच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून १ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार आज तेजपाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, तेजपाल देखील योग्य न्यायमिळविण्याच्या अधिकारास पात्र असल्याचे सांगत न्यायाधीश एच.एल दत्तू यांच्या खंडपीठाने तेजपालला जामीन मंजूर केला.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीला अनिश्चित काळासाठी कारागृहात ठेवता येऊ शकत नाही. तेजपाल यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे परंतु, अजूनही त्यातील कोणत्याही आरोपाखाली त्याला दोषी ठरविण्यात आलेले नाही. त्यामुळे व्यक्तीच्या जीवन आणि स्वातंत्र्याच्या अधिकारा संबंधित कोणताही अन्याय होऊ नये यासाठी जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटले आहे.