Supreme Court : केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जावा की नाही? याबाबतच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणी ऐकून घेतलं आहे. केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी महाभारत, रामयण आणि प्राचीन ग्रंथ यांची उदाहरणं दिली. तुषार मेहता म्हणाले प्रत्येक धर्मात वैविध आहे. शबरीला मंदिर प्रकरणात अयप्पाचे भक्त हा वेगळा संप्रदाय आहे. संविधानातील सूची २५ च्या अनुषंगाने संप्रदाय धार्मिक प्रथा काय असतील ते निश्चित करु शकतात. त्यामुळे अयप्पा भक्तांनी जर हे ठरवलं आहे की महिलांना मंदिरात प्रवेश द्यायचा नाही तर त्या परंपरेचा सन्मान केला पाहिजे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांचा युक्तिवाद काय? नागरत्ना काय म्हणाल्या?

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा की नाही याबाबत एक मतप्रवाह असा आहे की अनुच्छेद १७ मधील एका उल्लेखानुसार तुम्ही जणू काही महिलांना अस्पृश्य मानत आहात. मला यावर आक्षेप आहे. भारत हा इतका पितृसत्ताक किंवा लैंगिक रुढीवाद मानणारा देश नाही जेवढं हा देश आहे असं समजलं जातं. हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर जस्टिस बी.व्ही नागरत्ना मला हे कळत नाही की अनुच्छेद १७ चा मुद्दा आणि शबरीमला संदर्भ यांचा परस्पर संबंध जोडून वाद-प्रतिवाद कसा काय घातला जाऊ शकतो? त्या म्हणाल्या अनुच्छेद १७ अस्पृश्यतेच्या विरोधात आहे. त्यावरुन शबरीमला मंदिरातील प्रवेशाचे निकष कसे ठरवायचे? प्रत्येक महिन्यातील तीन दिवस महिलेला संमती नाही. चौथ्या दिवशी ती प्रवेश करु शकते. यावर तुषार मेहता म्हणाले की आपली चर्चा स्त्रियांच्या मासिक पाळीबाबत चाललेली नाही. त्यावर नागरत्ना म्हणाल्या की असं असेल तर मी एक महिला म्हणून हे सांगते आहे की अनुच्छेद १७ तीन दिवसांसाठी लागू होऊ शकणार नाही.

या वादानंतर तुषार मेहतांनी कुठले मुद्दे मांडले?

१) अनुच्छेद १७ चा उल्लेख स्त्रियांच्या मासिक पाळीशी संबंधित नाही. मी तो उल्लेख एका विशिष्ट वयाच्या महिलांबाबत केला.

२) अयप्पा मंदिर जगभरात आहेत, ही मंदिरं महिलांसाठी खुली आहेत. मात्र केरळमधील शबरीमला मंदिर हे त्याला अपवाद आहे.

३) दिल्लीत अयप्पाची तीन मंदिरं आहेत. ही तिन्ही मंदिरं महिलांसाठी खुली आहेत.

४) प्रत्येक धर्मातील प्रथांचा सन्मान आपल्याला ठेवता आला पाहिजे. याचा संबंध कुणाचाही आत्मसन्मान किंवा शारिरीक स्वातंत्र्य याच्याशी नाही. मी जर गुरुद्वारा किंवा मजार अशा ठिकाणी गेलो तर रुमालाने डोकं झाकतो. तेव्हा मी हे म्हणू शकत नाही की माझा स्वाभिमान हिरावून घेतला गेला किंवा अधिकार हिरावला आहे.

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काय म्हटलं आहे?

शबरीमला मंदिराबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तुषार मेहतांना सांगितलं की इथे नऊ न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आहे. पण तुम्ही वेळेचं पालन करत नाही आहात. आम्ही याबाबत आता अतिरिक्त वेळ देऊ शकत नाही. इतर प्रकरणांवरही निकाल देणं बाकी आहेत. आम्ही लिहून दिलेल्या सगळ्या गोष्टी वाचू पण तुम्ही वेळेची मर्यादा पाळा अशा सूचना त्यांनी तुषार मेहतांना दिल्या. ज्यावर तुषार मेहता म्हणाले तुम्ही जो निर्णय घ्याल त्याचा परिणाम पुढच्या ३० ते ४० वर्षांसाठी राहणार आहे. न्यायालयाची चिंता आम्हाला ठाऊक आहे, पण जो निकाल दिला जाईल त्याच्या परिणामांचाही विचार केला गेला पाहिजे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

केंद्रातर्फे तुषार मेहतांनी काय मुद्दे मांडले?

२०१८ मध्ये जो निर्णय दिला गेला त्यात तीन महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित करण्यात आले.

संविधान सभा मधील प्रतिवाद अनुच्छेद २५ आणि २६ च्या समावेशाचा आधार झाला.

भारतात धर्म व्यापक प्रमाणावर आहेत, त्यांच्यात वैविध्य आहे. हा प्रश्न फक्त एका धर्मापुरता मर्यादित नाही.

धर्मांमध्ये असलेलं अंतर्गत वैविध्य न्यायालयाने मान्य केलं नाही

भारतात असलेलं हे धार्मिक वैविध्य गौरवशाली आहे. धर्म हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा इतर.

महाभारत, रामायण आणि वेदांचा उल्लेख

तुषार मेहतांनी आपला युक्तिवाद करताना महाभारत, रामायण आणि प्राचीन वेदांचा हवाला दिला. हिंदू धर्माचं सौंदर्य हे आहे की तुम्ही आज्ञाधारक हिंदू होऊ शकतो. सनातन धर्म किंवा हिंदू धर्म असं व्यापक स्तरावर ज्या धर्माला म्हटलं जातं त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आपल्याकडे चार वेद आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. माणसाने आयुष्य कसं जगलं पाहिजे ते या वेदांमध्ये निर्धारित केलं गेलं आहे. आपल्याकडे चार उपवेद आहेत द्याच धनुर्वेद, गंधर्ववेद, आयुर्वेद आणि अर्थशास्त्र यांचा सहभाग आहे. आपल्या धर्मांत १८ महापुराणं आहेत, १८ उपपुराणंही आहेत. तसंच रामायण आणि महाभारत यांच्यासारखी महाकाव्यंही आहेत.