भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. आम्रपाली ग्रुपसोबत १५० कोटी रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. आम्रपाली ग्रुपच्या फ्लॅट वितरणाबाबत सद्या वाद सुरू आहे. या प्रकरणी आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

धोनीचे आम्रपाली ग्रुपकडे १५० कोटी थकीत आहे. हे थकीत पैसे मिळावे यासाठी धोनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होता. त्यानंतर हे प्रकरण लवादामध्ये गेले होते. याविरोधात आम्रपाली ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

दरम्यान, या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आधीच निधीच्या कमतरतेमुळे आमच्या ग्राहकांना घरं देण्यात आम्हाला अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे धोनीने १५० कोटी मिळावे, यासाठी उच्च न्यायालयात याचिक दाखल केली आहे. हे प्रकरण सद्या लवादाकडे आहे. अशा परिस्थित जर धोनीच्या बाजूने निर्यण लागला, तर आम्हाला ग्राहकांना घरं उपलब्ध करून देण्यात अडचणी येतील, असे आम्रपाली ग्रुपच्यावतीने सांगण्यात आले. अखेर न्यायालयाने याप्रकरणी धोनीला नोटील बजावली आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयातील याचिका देखील रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. यादरम्यान, त्याने या ग्रुपसाठी अनेक जाहीरातींचे चित्रीकरण केले होते. २०१६ मध्ये ग्राहकांनी आम्रपाली ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर धोनीने आम्रपाली ग्रुपसोबतचे सर्व व्यवहार बंद केले होते.