नवी दिल्ली : हरिद्वार व नवी दिल्ली येथे अलीकडेच झालेल्या दोन कार्यक्रमांत कथितरित्या द्वेषपूर्ण भाषणे करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार, दिल्ली पोलीस व उत्तराखंड पोलीस यांना नोटीस जारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या याचिकेची सुनावणी करण्याचे मान्य करून नोटीस जारी करणाऱ्या सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने, यापुढे ‘धर्मसंसदेचे’ कार्यक्रमांच्या आयोजनाविरुद्ध संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याची याचिकाकर्त्यांना परवानगी दिली. सूर्यकांत व हिमा कोहली या न्यायाधीशांचाही समावेश असलेल्या या खंडपीठाने याचिका १० दिवसांनंतर सुनावणीसाठी ठेवली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court issues notice to centre delhi police over hate speech zws
First published on: 13-01-2022 at 01:31 IST