नवी दिल्ली : ‘बीबीसी’ने तयार केलेल्या २००२ मधील गुजरात दंगलीवर आधारित वृत्तपटावर बंदी घालण्याच्या आदेशाशी संबंधित मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एम. एम. सुंदरेश यांच्या पीठाने ज्येष्ठ पत्रकार एन. राम, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि वकील एम. एल. शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना केंद्र व इतरांना नोटीस बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शर्मा यांनी या प्रकरणी एक वेगळी याचिका दाखल केली होती, जी आता वृत्तपटावर बंदी घालण्याच्या सरकारी आदेशाविरोधात दाखल झालेल्या इतर याचिकांसोबत वर्ग गेली गेली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे. न्यायालय म्हणाले, की आम्ही नोटीस बजावत आहोत. तीन आठवडय़ांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करावे. त्यानंतर दोन आठवडय़ांनी प्रत्युत्तर द्यावे. प्रतिवादी पुढील सुनावणीच्या तारखेला मूळ कागदपत्रेही या न्यायालयासमोर सादर करतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court issues notice to centre on pleas against blocking bbc documentary on pm modi zws
First published on: 04-02-2023 at 03:48 IST