कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या अहवालात हस्तक्षेप करणाऱया कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्यावर काय कारवाई करायची, याचा निर्णय शुक्रवारी संध्याकाळी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये घेतला जाईल. कायद्यामंत्र्यांच्या हस्तक्षेपाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढल्यानंतर अडचणीत सापडलेल्या कॉंग्रेसला अश्वनीकुमार यांच्यावर कारवाई करावीच लागेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राजधानीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या फेरबदलामध्ये अश्वनीकुमार यांचे खाते बदलले जाण्याची शक्यता आहे. 
कॉंग्रेस पक्षाशी संबंधित विधिज्ञांच्यामते या प्रकरणावरील पुढील सुनावणीच्या आत अश्वनीकुमार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणीवेळी प्रत्यक्षपणे कोणतीही कारवाई करण्याचे सुचित केले नसले, तरी सरकारने कारवाई केली पाहिजे, या स्वरुपाचे संकेत दिले होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असे मत विधिज्ञांनी व्यक्त केलंय. पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग या प्रकरणी काय भूमिका घेतात, हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.
पोपट का झाला?