उच्च न्यायालयाच्या वकील परिषदांमध्ये महिलांसाठी ३० टक्के राखीव जागा ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. ज्या राज्यांमधील वकील परिषदांसाठी निवडणुकांच्या अधिसूचना अद्याप निघालेल्या नाहीत, त्यांच्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
वकील परिषदांमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणारी याचिका योगमाया एम. जी. आणि शहला चौधरी यांनी दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सोमवारी निकाल दिला. मागील आठवड्यात न्यायालयाने राज्य वरील परिषदांमध्ये महिला वकिलांसाठी ३० टक्के राखीव जागा ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय वकील परिषदेला दिले होते.
या वर्षी वकील परिषदांमध्ये निवडणुकांच्या माध्यमातून २० टक्के जागा महिला सदस्य निवडल्या जाव्यात आणि उरलेल्या १० टक्के महिला सदस्य सह-निवड पद्धतीने सदस्य असाव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
