scorecardresearch

Premium

अबकारी घोटाळय़ात ‘आप’ आरोपी का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न

दिल्लीमधील कथित अबकारी घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सत्ताधारी आम आदमी पक्षालाही लाभ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

aam aadmi party
अबकारी घोटाळय़ात ‘आप’ आरोपी का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता )

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्लीमधील कथित अबकारी घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सत्ताधारी आम आदमी पक्षालाही लाभ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरीही हा पक्ष किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या खटल्यात आरोपी का केलेले नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) बुधवारी केला.

caa in assam,
सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
Manoj Jarange Patil assured the High Court that the agitation will be carried out in peaceful way
आंदोलन सर्वतोपरी शांततापूर्ण मार्गाने करणार, मनोज जरांगेंची उच्च न्यायालयात हमी
supreme court
चंदीगड महापौर निवडणूक: सुप्रीम कोर्टाला पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार आहे? कलम १४२ मध्ये काय म्हटलंय?
electoral bonds
न्यायालयाच्या निकालानंतर आता ‘निवडणूक रोखे’ रद्द; याचिकाकर्ते, सरकारचा युक्तिवाद काय? वाचा सविस्तर…

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्या. संजीव खन्ना आणि न्या. एस. व्ही. एन. भट्टी यांच्या खंडपीठाने ईडीची बाजू मांडणारे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता एस. व्ही. राजू यांना यासंबंधी विचारणा केली. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या नोंदींची न्यायालय तपासणी करू शकते का आणि संसदीय कामकाजाला कायद्यापासून जी सुरक्षितता असते तीच या नोंदींनाही असते का, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला.

हेही वाचा >>>अल्फ्रेड नोबेल कोण होते? नोबेल पुरस्कार कधी, कुठे आणि कसा सुरू झाला? वाचा जगातल्या सर्वोच्च पारितोषिकाबद्दल सर्वकाही

मनीष सिसोदिया अबकारी धोरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये आरोपी असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी गुरुवारी पुढे सुरू राहील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supreme court question to ed about aap in excise scam amy

First published on: 05-10-2023 at 02:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×