नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. कथित अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी (मद्या घोटाळा) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने हा भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने तपास यंत्रणेकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.

न्या. सूर्यकांत आणि उज्जल भूयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी युक्तिवाद केला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केजरीवाल यांना तीन वेळा अंतरिम जामीन मिळाला होता. हे प्रकरण कथित मद्या घोटाळ्याशीही जोडले गेले होते. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) खटल्यांमध्ये जामीन मंजूर करण्यासाठी कठोर अटी असूनही जामीन मिळाला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात जामिनासाठी कठोर अटी नसल्याने त्यांना नियमित जामीन नाकारला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने १० मे आणि १२ जुलै रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता, तर सत्र न्यायालयाने २० जून रोजी नियमित जामीन मंजूर केला होता, याकडे सिंघवी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

nashik district court Rahul Gandhi
राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने उपस्थित राहण्याचा हुकूम देण्याचे कारण…
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
cm eknath shinde on nair hospital case
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल; चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे निर्देश!
dr ajit ranade continues as gokhale institute vc till october 7 bombay hc
डॉ. अजित रानडे हे ७ ऑक्टोबरपर्यंत कुलगुरूपदी कायम; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Interrogation of Siddaramaiah by Lokayukta Police Decision of the Special Court
सिद्धरामय्यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी; विशेष न्यायालयाचा निर्णय, गुन्हा दाखल होणार
Controversy over ministership in Shiv Sena
शिवसेनेतील मंत्रिपदाची रस्सीखेच चव्हाट्यावर
Jammu and Kashmir state status marathi news,
“जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास कटीबद्ध”, श्रीनगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली? काय आहे राजकीय गणित?