त्रिपुरातील निवडणुका वेळापत्रकानुसारच; याचिका फेटाळली

या निवडणुका २५ नोव्हेंबरला होणार आहेत. त्या लांबणीवर टाकण्याची मागणी तृणमूल काँग्रेसने याचिकेद्वारे केली होती.

Supreme-Court
(Photo- Indian Express)

नवी दिल्ली : त्रिपुरामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकाव्यात यासाठी तृणमूल काँग्रेसने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. या निवडणुका शांततेत होण्यासाठी निमलष्करी दलाची कुमक उपलब्ध करून देण्याबाबत राज्य निवडणूक आयुक्तांनी बुधवारी पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांसोबत बैठक घ्यावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. 

त्रिपुरात आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात पोलीस गुन्हे दाखल करीत नाहीत, अशी तक्रार तृणमूल काँग्रेसने न्यायालयापुढे केली होती. त्याची दखल घेत, अशा प्रकरणांत किती तक्रारी आल्या, त्याच्यावर काय कार्यवाही केली आणि किती प्रकरणांत गुन्ह्यांची प्रथम वर्दी नोंदविण्यात आली, याचा लेखाजोखा सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.  या निवडणुका २५ नोव्हेंबरला होणार आहेत. त्या लांबणीवर टाकण्याची मागणी तृणमूल काँग्रेसने याचिकेद्वारे केली होती. ती मान्य न करता न्यायालयाने निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश दिले. निवडणूक लांबणीवर टाकणे हा अंतिम आणि टोकाचा उपाय झाला. त्याऐवजी याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे निराकरण करण्यासाठी त्रिपुरा सरकारला आम्ही निर्देश देत आहोत, असे न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पीठाने स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Supreme court refuses trinamool plea to postpone tripura civic polls zws

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या