scorecardresearch

राज्यपालांविरोधातील याचिकांची आज सुनावणी ; विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयके रोखण्यास आव्हान

तमिळनाडूचे राज्यपाल रवि यांनी विधि मंडळाने मंजुरी दिलेली १० विधेयके स्वाक्षरीविना परत पाठवली होती.

supreme court
सर्वोच्च न्यायालय (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली : विधिमंडळांनी मंजूर केलेल्या परंतु राज्यपालांनी स्वाक्षरीविना प्रलंबित ठेवलेल्या विधेयकांबद्दलच्या तमिळनाडू आणि केरळ सरकारच्या दोन स्वतंत्र यांचिकांची सुनावणी आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

तमिळनाडूचे राज्यपाल रवि यांनी विधि मंडळाने मंजुरी दिलेली १० विधेयके स्वाक्षरीविना परत पाठवली होती. त्यांच्या या कृतीविरोधात तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. केरळ विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयके त्या राज्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी प्रलंबित ठेवल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या दोन्ही यांचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.   

court hammer
मविआच्या काळातील विकासकामांची स्थगिती उठवली ; उच्च न्यायालयाकडून सर्व याचिका निकाली
nana patole
सामान्यांना मंत्रालयात प्रवेशबंदी – पटोले
Ajit Pawar dhangar samaj
धनगर समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी ट्विटरद्वारे दिली माहिती
Nana Patole Bhandara
भंडाऱ्यातील दहीहंडी दुर्घटनेप्रकरणी नाना पटोलेंनी केली ‘ही’ मागणी; म्हणाले, “प्रकरण दाबण्याचा…”

हेही वाचा >>> गाझातील शिफा रुग्णालयातून ३० नवजात बालकांना हलवले; उपचारांसाठी इजिप्तला पाठवण्याची शक्यता

राज्यपालांनी परत पाठवलेली दहा विधेयके तमिळनाडू विधिमंडळाने  शनिवारी पुन्हा मंजूर केली. विधि, कृषि आणि उच्च शिक्षण विभागासह विविध खात्यांशी संबंधित असलेली ही विधेयके राज्यपाल रवि यांनी १३ नोव्हेंबरला परत पाठवली होती.

तीन विधेयके दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित ठेवून राज्यपाल राज्यातील नागरिक आणि लोकशाही संस्थांवरही घोर अन्याय करीत असल्याचा आरोप केरळ सरकारने केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supreme court to hear tamil nadu kerala pleas against their governors zws

First published on: 20-11-2023 at 03:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×