पीटीआय, नवी दिल्ली

बलात्काराची बळी ठरलेली एक महिला ‘मांगलिक’ (मंगळ असलेली) आहे अथवा नाही हे लखनऊ विद्यापीठाच्या फलज्योतिष विभागाच्या प्रमुखांना ठरवण्यास सांगणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विलक्षण आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली.या प्रकरणाच्या सुनावणीसाठी शनिवारी विशेष बैठक (सीटिंग) घेणाऱ्या न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली. जामीन अर्जावर निर्णय घेताना ज्योतिषविषयक अहवाल का मागवण्यात आला हेच आपल्याला कळत नसल्याचे न्यायालयाने सांगितले.

bombay high court, nagpur bench Judges, cast vote, queue
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी रांगेत…
arvind kejriwal
उच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताच केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव, दिलासा मिळणार?
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या इसमाच्या जामीन अर्जाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने २३ मे रोजी वरीलप्रमाणे आदेश दिला होता.ही महिला ‘मांगलिक’ असल्यामुळे, दोघांचा विवाह संपन्न होऊ शकला नाही आणि आपल्या अशिलाने त्यास नकार दिला, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला होता. मात्र, महिलेची बाजू मांडणाऱ्या वकिलाने ती ‘मांगलिक’ नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते.
उच्च न्यायालयाने पक्षकारांच्या संमतीशिवाय हा आदेश पारित केला, असे तक्रारकर्त्यां महिलेतर्फे युक्तिवाद करणाऱ्या वकिलाने सांगितले.या आदेशाचा मूळ विषयाशी काही संबंध नसल्याचे सांगून, न्या. सुधांशु धुलिया व न्या. पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.