देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम जोरात सुरू आहे. बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात आलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गादरम्यान बांधले जाणारे सुरत हे पहिले स्थानक असेल. एका अधिकाऱ्याने बुधवारी याबाबत माहिती दिली. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “चार स्थानकांवर (वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच) कामाला वेग आला आहे आणि ते डिसेंबर २०२४ पर्यंत तयार होतील. या चार स्थानकांपैकी सुरत हे तयार होणारे पहिले स्थानक असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चार स्थानकांव्यतिरिक्त, २३७ किमी लांबीचा एक पूल देखील बांधला जाईल. हा एक विशिष्ट प्रकारचा पूल आहे, ज्यामध्ये उंच आणि लांब रेल्वे लाईन किंवा रस्त्याला आधार देणाऱ्या कमानी आणि खांब असतात. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, भारतातील पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये सुरत ते बिलीमोरा दरम्यान धावेल. सुरत- बिलीमोरातील अंतर ५० किलोमीटर आहे.

indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
Lok Sabha Election 1952 First Vote, First Ballot Box History in Marathi
पहिल्या-वहिल्या मतपेट्यांची कहाणी; ७० वर्षांपूर्वी मुंबईत झालं होतं विक्रमी उत्पादन, ‘या’ कंपनीकडे दिली होती जबाबदारी!
Job Opportunity Recruitment of Technician Posts career
नोकरीची संधी: टेक्निशियन पदांची भरती

दरम्यान, मोदी सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प भूसंपादनाच्या लढाईत अडकला आहे. मात्र, मंत्रालयाने याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांना उत्तर देताना मंत्री वैष्णव बुधवारी म्हणाले, “गुजरातमधील ९८.६२% जमीन (९५४.२८ हेक्टरपैकी ९४१.१३ हेक्टर) प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात, संपूर्ण संपादन (७.९० हेक्टर) आणि महाराष्ट्रात ५६.३९% जमीन (४३३.८२ हेक्टरपैकी २४४.६३ हेक्टर) संपादित करण्यात आली आहे. यामध्ये ९२५ हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे. यासंदर्भात झी न्यूजने वृत्त दिलंय.

बुलेट ट्रेनचे मुंबई ते अहमदाबादमधील स्टेशन –

 मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन २०१७ मध्ये झाले. सुरुवातीला या प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु करोनामुळे भूसंपादनातील समस्या आणि बांधकाम विलंबामुळे प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला. ५०८ किमी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे बुलेट ट्रेनचे स्टेशन असतील.